भेसळयुक्त जिलबीच्या विक्रीचे प्रकार

0
161

गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात भेसळयुक्त फर्साव एलमचा वापर केलेल्या जिलबीची विक्री करण्याचे प्रकार सुरू असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने छापासत्र सुरू केले आहे. सुमारे ३७ हजार रुपये किंमतीचे वरील प्रकार जप्त केल्याची माहिती संचालक डॉ. सलीम वेलजी यांनी दिली. आवश्यक ते परवाने नसताना व स्वच्छतेची काळजी न घेणार्‍या विक्रेत्यांना उत्पादन बंद करण्याचा आदेश दिला आहे.
‘एलम’ या रसायनाचा वापर केलेली जिलबी आरोग्यास अपायकारक असल्याचे सांगण्यात आले. संबंधितांवर गंभीर कारवाई करण्याचे ठरविले आहे. भेसळयुक्त पदार्थांची विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.