काही लाभाच्या पदांना संरक्षण

0
82

आमदार अपात्रता दुरुस्ती संमत
सरकारने सभागृहात दाखल केलेले गोवा विधानसभा सदस्य अपात्रता दुरुस्ती विधेयक काल विधानसभेत संमत करण्यात आले. नव्या दुरुस्तीद्वारे काही संस्थांच्या लाभाच्या पदावरून आमदारांना वगळण्यात आले. त्यामुळे या पदांवर विधिमंडळ सदस्य अध्यक्ष असल्यास ते आमदार म्हणून अपात्र होऊ शकणार नाहीत. या संस्थांत रवींद्र भवनचे अध्यक्ष, गोवा कोकणी अकादमी, गोवा मराठी अकादमी यावरही आमदार अध्यक्ष असल्यास त्यांना वरील विधेयकाचा फायदा होईल तर गोवा महिला शक्ती पंचायत अभियान, बाजार महासंघ व गोवा फुटबॉल महामंडळ या संस्थांच्या उपाध्यक्षांनाही वरील तरतुदीचा लाभ मिळेल.