हॉस्पिसियुतही अनुपलब्ध
कासावली-वेळसाव येथील २५ जणांना रॅबीज झालेला कुत्रा चावल्याने गोमेकॉत आणले असता त्यांना टोचायचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने बरीच धावपळ करावी लागली. शेवटी आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या पैशांतून खासगी वितरकाकडून विकत घेऊन इंजेक्शने गोमेकॉला उपलब्ध करून द्यावी लागली.
कासावली वेळसाव येथे एक रॅबीज झालेला कुत्रा २५ जणांना चावला. त्यामुळे या जखमींना आधी मडगावच्या हॉस्पिसियु इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेथे रॅबिजप्रतिबंधक इजेक्शने उपलब्ध नव्हती. त्यामुळे या सर्वांना बांबोळी येथे गोमेकॉत पाठविण्यात आले. तेथे सर्वांना दोन इंजेक्शने देण्यात आली. मात्र तिसरे आवश्यक असलेले इंजेक्शन गोमेकॉतही उपलब्ध नव्हते. त्यामुळे बरीच धावाधाव झाली. शेवटी मंत्री पार्सेकर यांनी आपण ही इंजेक्शने विकत घेऊन रुग्णांना उपलब्ध करून दिली.
ही इंजेक्शने बरीच महाग असून रॅबीज झालेला कुत्रा चावल्यानंतर ती तात्काळ द्यावी लागतात.