विदेश सचिव बोलण्यांआधी पाकची फुटीरतावाद्यांशी चर्चा

0
74

भारत – पाकिस्तान दरम्यानच्या विदेश सचिव स्तरावरील बोलण्यांची तारीख जवळ असतानाच काल पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी काश्मीरी फुटीरतावादी नेत्यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलावले. याबाबत भाजपने तीव्र नापसंती व्यक्त केली तर कॉंग्रेसनेही ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. हुरीयत कॉन्फरन्स, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी उभय राष्ट्रांतील विदेश सचिवांत इस्लामाबादेत चर्चा होणार आहे.