पाकिस्तानात स्वातंत्र्य दिन फेरी काढणार्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर विरोधकांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकाराला नवाज शरीफ सरकार जबाबदार असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
मात्र इम्रान खान सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार गुजरानवाला येथे इम्रान खान यांच्या वाहनांवर गोळीबार झाला. यानंतर इम्रान खान यांनी शरीफ यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे.