पर्ये-राणेवाडा येथील रहिवासी विनोद वसंत मठकर (वय ३६ ) याने पर्ये गुरववाडा येथील आपल्या सासुरवाडीत व्हरांड्यात पांढर्या कपड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काल सकाळी जेव्हा घरातील लोक उठून बाहेर आले तेव्हा त्यांना विनोद याचा मृतदेह लोंबकळताना दिसला. त्याला पत्नीसह दोन मुले आहेत. त्याची पत्नी आपल्या माहेरी होती. तर विनोद हा आपल्या घरी होता. त्याने रात्री येऊन आपल्या सासरवाडीत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पण कौंटुंबिक कारणावरून आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. घटनेचा पंचनामा वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपई पोलिसानी केला. मृतदेह चिकित्सेनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.