पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज लडाखला भेट देणार आहेत. पंतप्रधान बनल्यानंतर त्यांची जम्मू काश्मीर राज्याला ही दुसरी भेट आहे. लडाखमध्ये ते दोन जलविद्युत प्रकल्पांचे उद्घाटन करतील तसेच ३३० कि.मी. लेह – श्रीनगर ट्रान्समीशन लाइनची पायाभरणी करतील. नव्या वीज विहिनीनंतर लडाख व कारगिल जिल्ह्याची वीज समस्या सुटणार आहे. श्रीनगर-लेह वीज जोडणीची घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी २००३ साली केली होती.