जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सिमारेषेवर पाकिस्तानच्या बाजूने झालेल्या गोळीबारात दोन सैनिकांसह चौघे जखमी झाले. दरम्यान, नंतर गोळीबार थांबला मात्र सिमेवर सतर्कता ठेवली आहे. ही पाकिस्तानकडून करण्यात आलेले आणखी एक शस्त्रसंधीचे उल्लंघन होते. सोमवारी पहाटे ४.१५ वा. हा गोळीबार सुरू झाला. यात सीमा सुरक्षा दलाचे सुनील कुमार व बिष्णू नंदन यादव जखमी झाले. राणी देवी व रिशु कुमार या महिलाही जखमी झाल्या. रविवारीही शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते.