‘इबोला’ रूग्ण भारतातही

0
81

आफ्रिकी देशांमध्ये सुमारे ९०० जणांचा बळी घेणार्‍या इबोला व्हायरसचा चेन्नई येथे आढळून आला आहे. मात्र हा रुग्ण भारतीय नसून तो न्यू गिनी देशातून आला आहे. सध्या त्याच्यावर चेन्नईतील राजीव गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर रुग्णाला इबोला व्हायरसची लागण झाल्याचा डॉक्टरांनी संशय व्यक्त केला असून त्या दृष्टीने त्याची तपासणी सुरू झाली असल्याचे वृत्त आहे.जगभरात धुमाकूळ घातलेल्या इबोला व्हायरसने आतापर्यंत आफ्रिकेतील देशांमधील सुमारे ९०० जणांचे बळी घेतले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या शुक्रवारी अन्य देशांमध्येही त्याची लागण झाल्याने जागतिक आणिबाणी जाहीर केली आहे. सिएरालियॉन, लायबेरिया, गिनिया, नायजेरिया या देशांमध्ये इबोलाने महामारीचे रूप घेतले आहे. सुमारे १७०० जणांना या रोगाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे सध्या दिल्लीत मोठ्या संख्येने आफ्रिकी देशांचे नागरीक पर्यटन, तसेच शिक्षणानिमित्त आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतात २४ तास मदतवाहिनी सेवा सुरू करण्यात आली आहे.