मुलीच्या जन्माचे प्रमाण वाढावे म्हणून सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी ‘ममता’ या योजनेखाली मुलीच्या जन्मानंतर मातेला ५ हजार रुपये सकस आहारासाठी, तर कन्यादान योजनेखालील मदतीत १५ हजारावरून २५ हजार रुपये वाढ करण्याचे ठरविले असून सदर योजना गेल्या एप्रिलपासून लागू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिली.
केप्यात नवा सहकार विभाग
काणकोण, सांगे या भागातील सहकारी क्षेत्रातील लोकांची सोय करण्यासाठी केपे हा नवा विभाग स्थापन करून तेथे सहाय्यक निबंधकांची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी वरील भाग फोंडा विभागाखाली येत होता.
चालू शैक्षणिक वर्षापासून फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात चार वर्षांचा ‘मायनिंग’ पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अभ्यासक्रमाच्या खर्चाची जबाबदारी सेझा गोवा कंपनीने उचलली असून पाच वर्षेपर्यंत वरील कंपनी खर्च करील, असे कामत यांनी सांगितले.
पश्चिम घाट विकास योजनेखाली वेगवेगळ्या भागांत मिळून १० संगणक केंद्रे उघडण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.