चेनाब नदीत वाहावत पाकिस्तानच्या हद्दीत पोचलेल्या भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला पाकिस्तानने काल ४८ तासांनंतर भारताच्या स्वाधीन केले. दरम्यान, पाकिस्तानने आपणास चांगली वागणूक दिल्याचे ३० वर्षीय जवान सत्यशील यादव याने सांगितले. तो ज्या नावेतून वाहत गेला होता तीही भारताच्या हवाली करण्यात आली. जम्मूतील आर एस पुरा सेक्टरमध्ये आंतराष्ट्रीय सीमेवर त्याला भारताच्या हवाली करण्यात आले. यादव याने सांगितल्यानुसार गस्त नदीत अचानक बोटीचे इंजिन बिघडल्यानंतर इतरांनी नदीत उड्या टाकून ते पोहून भारतीय सीमेत आले मात्र तो बोटीतून पाकिस्तानी हद्दीत पोचला.