सर्व शहरांमध्ये ट्रक टर्मिनससाठी प्रयत्न

0
100

राज्यातील सर्व शहरांमध्ये ट्रक टर्मिनसची गरज आहे. तशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी काल विधानसभेत आमदार विजय सरदेसाई यांच्या यासंबंधीच्या मूळ प्रश्‍नावरील चर्चेवेळी दिली. फातोर्डा येथील १ लाख ३५ हजार चौ. मी. जमीन वरील प्रकल्पासाठी ताब्यात घेतली होती. जनतेच्या विरोधामुळे प्रकल्प रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. वरील जमिनीतील काही भाग वगळल्यासंबंधीची आपल्याला माहिती नाही. पुराव्यासह दाखवून दिल्यास चौकशी करणे शक्य असल्याचे मंत्र्यांनी सरदेसाई यांना सांगितले.