आदिवासी कल्याण खात्यातर्फे राज्यात आदिवासींसाठी सुमारे सात ते आठ हजार घरे बांधून देण्याची सरकारची योजना आहे. तसेच ज्याना घरे दुरुस्ती करायची आहे त्यांना त्यासाठीही पैसे देण्यात येणार आहेत.
तसेच आदिवासींसाठी राज्यभरात आठ सांस्कृतिक भवने उभारण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १० पूर्व प्राथमिक विद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. काणकोण येथे या विद्यार्थ्यांसाठी आश्रम स्कूल उभारण्यात येत आहे. आदिवासी समाजातील ५०० गुणवंत विद्यार्थ्यांना या विद्यालयाचा लाभ मिळणार आहे. ज्या गावात आदिवासींचे प्रमाण ३० टक्के आहे तेथेच त्यांच्यासाठी सांस्कृतिक भवने उभारण्यात येणार आहेत. गेल्या २ वर्षांत आपल्या खात्याने आदिवासींच्या २० योजनांची अमलबजावणी करण्यात आल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले.