नारायण राणेंकडून राजीनामा मागे

0
191

महाराष्ट्रात नेतृत्वबदल करणार नसल्याबाबत कॉंग्रेस श्रेष्ठी ठाम असतानाही नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा दिलेला राजीनामा काल मागे घेतला. आपणास ‘योग्य तो आदर’ दिला जाईल असे वचन दिले गेल्याने आपण ही तडजोड केल्याचे ते म्हणाले. पंधरवड्यापूर्वी राणे यांनी नेतृत्वबदल होत नसल्याच्या निषेधार्थ मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तसेच सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाकाली कॉंग्रेस आगामी निवडणुकीत पराभूत होईल, असे भाकित वर्तविले होते व आपणास पराभवाचे भागिदार बनायचे नाही, असे म्हटले होते.
काल राणे यांनी, आपण कॉंग्रेसच्या विजयासाठी वावरणार असल्याचे सांगितले. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, यांच्याशी चर्चेनंतर राजीनामा मागे घेण्याचे ठरवले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आपणास निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती मात्र श्रेष्ठींना आपण निवडणूक लढवलेली हवी आहे, असे राणे म्हणाले.