गुजरातचे राज्यपाल कोहलींकडे गोव्याचा ताबा

0
127

गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा देण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनातून जारी आदेशात म्हटले आहे. सध्या गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा असलेल्या मार्गारेट आल्वा यांचा कार्यकाळ ५ ऑगस्टला संपल्यामुले ही व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, आल्वा यांच्याकडे गोव्याचा ताबा तसेच राजस्थानचे राज्यपालपद होते. राजस्थानच्या राज्यपालपदाचा ताबा आता उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्याकडे असेल.