केपे अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या शिरोडा (फोंडा) शाखेत बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून ४ लाख ९० हजार रुपये कर्ज काढल्याचा आरोप असलेला त्रिमूर्ती शेट शिरोडकर शिरोडा याला काल फोंडा पोलिसांनी अटक केली. दि. १४ फेब्रुवारी २०१४ रोजी शिरोडा शाखेत बनावट सोने तारण ठेवून अंदाजे दीड कोटी रुपयांचे कर्ज उकलल्या प्रकरणी बँकेचे कार्यकारी संचालक परेश कुंकळीकर यांनी २९ जणांविरुद्ध फोंडा पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर ही धरपकड सुरू आहे. आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. आणखीही आरोपींचा शोध चालू आहे.