बिहारात जलप्रलयाची भीती; यंत्रणा सज्ज

0
112

कोसी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यामुळे २००८सदृश्य पुराची भीती निर्माण झाली आहेत. नेपाळमध्ये शनिवारी दरड कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घसरून खाली आलेल्या माती व दगडांनी कोसीच्या उपनदीच्या मार्गात अडथळे निर्माण केले असून त्यामुळे भारताकडील भागात पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे.
दरम्यान, सरकारने पुराचा इशारा दिल्यानंतर कोसी किनार्‍यावरील भागातील लोकांनी भीतीने पलायन सुरू केले आहे. सरकारने स्वत: रविवार सकाळपर्यंत सुमारे २० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असल्याचे, राज्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकुण २ लाख लोकांना सुरक्षित स्थळ हलविण्याचे लक्ष्य आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हवाई दल तसेच आपत्कालीन दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.