एका बॉलीवूडपटाला साजेशी घटना काल नेपाळात घडली आणि त्याला कारणीभूत होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान मोदींमुळेच २६ वर्षीय जीत बहादूर या युवकाचे त्याच्या कुटुंबाशी पुनर्मिलन होऊ शकले.
बहादूर हा १६ वर्षांपूर्वी भारतात हरवला होता. तो अहमदाबादेत मोदींना सापडला. तेव्हापासून पालक म्हणून मोदींनी त्याला सांभाळले. त्यांच्या शिक्षणाचा खर्चही केला. काल त्याला मोदींनी नेपाळला पोचल्यानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. बहादूरची आई खगिसारा, भाऊ दशरथ व बहीण यावेळी उपस्थित होती.
बहादूरचे कुटुंबीय नेपाळच्या नवलपारस जिल्ह्याच्या एका झोपडपट्टीत राहतात.
बहादूर म्हणतो, की जेवढे मोदींनी केले तेवढे सख्ख्या नातेवाईकांनीही केले नसते. तो सध्या द्वितीय वर्ष बीबीए अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे. मात्र त्याला मातृभाषा नेपाळी बोलता येत नसून हिंदीत तो अस्खलितपणे बोलू शकतो.