कामगार अजून बेपत्ता
शुक्रवारी मासेमारीसाठी गेलेल्या खारेवाडा येथील फ्रांसिस डिसोझा यांचा मृतदेह काल सकाळी ९.३०च्या सुमारास बायणा समुद्र किनार्यापासून ३०० मीटर अंतरावर पाण्यात तरंगताना सापडला. बुडालेल्या ट्रॉलरवरील उर्फ पप्पू (उत्तर प्रदेश) याचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही.
रोजमारिया ट्रॉलर उलटून समुद्रात बुडाला होता. पाच कामगारांसह मालक या ट्रॉलरमध्ये होते. त्यापैकी चौघे जण ट्रॉलरच्या काठावर बसले असता लाट येऊन सदर ट्रॉलवर आदळल्याने ते चौघे बाहेर फेकले गेले. ट्रॉलर मालक फ्रांसिस डिसोझा ट्रॉलर चालवत होते. त्यांच्यासोबत आणखी एक कामगार हरिश्चंद्र आत केबीनमध्ये होते. त्यांना बाहेर येण्याची संधी न मिळाल्याने ते दोघेही ट्रॉलरसह बुडाले. बेपत्ता असलेल्यांचा शोध तटरक्षक दलाच्या जवानांकडून चालू होता. अखेर काल सकाळी ट्रॉलरमालकाचा मृतदेह तरंगताना सापडला. यावेळी बायणा किनार्यावर मयत फ्रांसिसचे नातेवाईक, माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा, माजी नगरसेवक सॅबी डिसोझा, अखिल गोवा ट्रॉलर मालक संघटनेचे अध्यक्ष सायमन परेरा, दृष्टीचे संचालक पी. एन. पांडे, क्लेमंट डिसोझा तसेच इतर लोक उपस्थित होते.