वास्को सप्ताहाला काल उत्साहात प्रारंभ झाला. दुपारी १२.३० वाजता उद्योजक परेश जोशी यांच्याहस्ते श्रीफळ ठेऊन तसेच हरीनामाच्या जयघोषात सप्ताहाला पारंपरिक पध्दतीने सुरुवात करण्यात आली. तसेच वेगवेगळ्या समाजांतर्फे निघणार्या पारांच्या विविध समित्यांतर्फे श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवण्यात आले. सप्ताहाला प्रारंभ करतेवेळी उद्योगपती नाना बांदेकर तसेच आमदार कार्लुस आल्मेदा, विनायक घोंगे, प्रताप गांवकर, दामोदर कोचरेकर आदी उपस्थित होती. तद्नंतर वीजमंत्री मिलींद नाईक, वास्को पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर, मुरगांव पालिका मुख्याधिकारी मेघनाथ परब, नगरसेवक शेखर खडपकर, मनिष आरोलकर, दाजी साळकर, आदिंनी श्रींच्या प्रसादाचा लाभ घेतला. सप्ताहाची सुरुवात हरीनामाच्या जयघोषात करण्यात आली. ज्येष्ठ भजनी कलाकार मनोहर मांद्रेकर (शिवोलकर), सुर्या शेट्ये, गोकुळदास च्यारी, अनिल कोंडुरकर, बापू नाईक आदींनी श्रींच्या जयघोषाने भजनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर साखळी पध्दतीने वेगवेगळ्या पथकांची भजने सादर करण्यात आली.