चीनमधील कारखान्यातील स्फोटात ६५ ठार

0
125

चीनच्या जियांगसू प्रांतातील एका धातूच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ६५ कामगार ठार झाले असुन १०० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. शांघायनजीकच्या कुनशान शहरातील कारखान्यात ही दुर्घटना काल घडली. स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात २०० हून अधिक कामगार होते. मदतपथकांनी सुमारे ४० मृतदेह बाहेर काढले. तर २० जण इस्पितळात मरण पावले.