सरकारने मासेमारीची बंदी ३१ जुलै रोजी संपली असली तरी काल वादळी वार्यामुळे बहुतेक बोटी खोल समुद्रांत सोडल्या गेल्या नाहीत. काल कुटबण जेटीवरून आठ बोटी गेल्या होत्या. पण खवळलेल्या समुद्रामुळे त्या परत आल्या. कुटबण जेटीवर काम करणारे बहुतेक कामगार दाखल झाले. काल पहाटेपासून ते बोटी सोडण्यासाठी तयार झाले होते. या जेटीवर तीनशे बोटी असून, पहिल्याच दिवशी तीस टक्के बोटी जातील असा विश्वास कुटबण बोट मालक संघटनेचे अध्यक्ष सिप्रियानो कार्दोज यानी केला होता. पण समुद्र खवळलेला असल्याने फक्त ८ बोटी सोडण्यात आल्या. सर्व बोटी सुसज्ज असून त्यात लागणारी जाळी, लाईफ जेकेट तसे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आज हवामानाचा अंदाज घेऊन त्या सोडण्यात येतील.