विधानसभेत वाघांचा सरकारला इशारा

0
128

… तर रस्त्यावर येऊ
आपल्या मतदारसंघातील मागण्या पूर्ण न झाल्यास नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा विष्णू वाघ यांनी काल विधानसभेत साबांखा व वाहतूक खात्याच्या मागण्यांवरील चर्चेच्यावेळी दिला.
वरील खात्यांच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा की नाही हे आपणास कळत नाही. असे सांगून वाघ यांनी चर्चेस सुरुवात केली. आपल्या मतदारसंघातील कामे होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या १५-२० वर्षांच्या काळात आपल्या भागात विकास झालाच नाही. परिवर्तनाच्या लाटेत तो होईल असे वाटले होते, असे सांगून मतदारसंघातील कामे पूर्ण करण्याच्या मागण्या करून कंटाळा आल्याचे वाघ यांनी सांगितले. या विधानसभेत आपण पुन्हा पुन्हा मागण्या करीत असल्याचे त्यांनी सांगितले.