घरगुती सिलिंडरांचा व्यापारी वापर; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

0
122

घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी सिलिंडरांच्या व्यापारी वापराचे प्रमाण वाढले असल्याने संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी पोलीस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक स्थापन करण्याची मागणी गोवा कॅनने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली आहे.
या पथकात नागरी पुरवठा तसेच गॅस कंपन्यांच्या अधिकार्‍यांचा समावेश असणे आवश्यक आहे. एलपीजीच्या ग्राहकांकडून अनेक तक्रारी येतात. मात्र आवश्यक यंत्रणा नसल्याने कारवाई करणे कठीण होते. काल राय येथून मडगावच्या एका वाहनातून कुंकळ्ळी येथे नेण्यात येत असलेले १० सिलिंडर जप्त करण्यात आले असले तरी राज्याच्या अनेक भागात सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे रोलन्ड मार्टिन यांनी म्हटले आहे. दि. १६ जुलै रोजी नागरी पुरवठा खात्याच्या अध्यक्ष दिपाली नाईक यांनी बोलावलेल्या पेट्रोलियम कंपनीच्या बैठकीत एलपीजी सिलिंडरचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. बेकायदेशीरपणे सिलिंडरमध्ये गॅस भरण्याची काही केंद्रे असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ङ्गगोवा कॅनफने केली आहे.