अमेरिकेचे जॉन केरी आज भारतात

0
116

नव्या सरकारशी भेट घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी अमेरिकेचे सेक्रेटरी फॉर स्टेट जॉन केरी हे आज भारतात येत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबरमध्ये होणार्‍या वॉशिंग्टन भेटीची पार्श्‍वभूमीही केरी यांच्या भेटीला लाभली आहे. केरी हे पंतप्रधान मोदी व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यात धोरणात्मक सहकार्य, ऊर्जा, हवामान बदल, शिक्षण, अर्थव्यवस्था आदी विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान, ते मुंबई व बेंगळूर शहरांनाही भेट देतील.