गाझापट्टीत मृतांची संख्या ११३०

0
133

पॅलेस्टीनच्या गाझापट्टीत इस्त्रायली बॉम्बहल्ले चालूच असून काल इस्त्रायली हेलिकॉप्टर्सनी हमास नेते इस्माईल हनीए यांचे घर उद्ध्वस्त केले. मात्र हल्ल्यावेळी घरात कोणीही नव्हते. दरम्यान, या हल्ल्यात आतार्पंत मृतांचा आकडा १ हजार १३० इतका झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांतील हल्ल्यात ४३ जण ठार झाले आहेत. ‘ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज्’ म्हणून दि. ८ जुलैपासून इस्त्राईलकडून हल्ले चालू असून त्यात सुमारे ६५०० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, युद्धबंदीसाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय समूहाचा दबाव चालूच असून मात्र इस्रायलने त्याला प्रतिसाद दिलेला नाही.