‘टीएफए’वर स्वाक्षरीसाठी  भारतावर दबाव

0
142

ट्रेड फॅसिलिटेशन करारावर स्वाक्षरी करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारताने मात्र अन्न सुरक्षेबाबत तसेच गरीब राष्ट्रांतील भुकेच्या प्रश्‍नाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढला जाईपर्यंत आपण स्वाक्षरी करणार नसल्याचे सांगून अनेक विकसित राष्ट्रांची कोंडी केली आहे. अन्नधान्यास अनुदानावर मर्यादा आणण्याचे महत्त्वाचे कलम करारात आहे. भारत स्वाक्षरी करीत नसल्याबद्दल अमेरिकेनेही नाराजी व्यक्त केली आहे.