मुतालिक नावाचा जो आजार स्वीकारलेला आहे त्याचा राज्याच्या पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम होणार आहे, असा इशारा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला. केंद्रात मोदींचे सरकार आल्यानंतर आता सरकारची भाषाच बदलल्याचे सरदेसाई यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी सांगितले.
सरकारने राबविलेल्या काही योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे. भविष्यकाळात या योजनांमुळे राज्याला अडचण होईल, असेही त्यांनी सांगितले. मुतालिकामुळे अल्पसंख्यंकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच ते विदेशात जाणे पसंत करीत आहे, असे त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना सरदेसाई यांनी चोरीस गेलेले सोने पोलिसांनी गिळंकृत केले आहे. अशा पोलिसांची बदलीही होत नाही, असे ते म्हणाले. शिक्षण माध्यम प्रश्नामुळे कोकणीचे निधन झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. सरदेसाई यांनी अर्थसंकल्प वगळता अन्य विषयांवर न बोलण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.