क्षेपणास्त्र हल्ल्याने पाडलेल्या मलेशियन विमानाच्या ढीगार्यांमधून शोधून काढलेले २१९ मृतदेह बंडखोरांनी आपल्या नियंत्रणात ठेवले आहे. दुसरीकडे बंडखोरांच्या ताब्यातील दुर्घटनास्थळी जाण्यास द्यावे यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमेर पुतीन यांच्यावर दबाव वाढत आहे. त्यातच अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी जॉन केरी यांनी गौप्यस्फोट करताना विमान पाडण्यासाठी वापरलेले क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हे रशियातून आणले होते असे सिद्ध करणारे पुरावे असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला येत्या काळात आणखी वेगळे वळख प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मलेशियन एअरलाइन्सचे बोइंग ७७७ हे ऍम्स्टडेम ते क्वालालंपूर प्रवास करणारे विमान गुरुवारी युक्रेनमध्ये बंडखोरांनी क्षेपणास्त्र हल्ल्याने पाडले होते. अपघातात विमानातील सर्व २९८ जण मरण पावले होते.