कर्नाटकातील बेल्लारी भागातील सर्व खाणींना ताबडतोब काम बंद करावे असे सुप्रीम कोर्टाने काल सांगितले. पुढील आदेश देण्यात येईपर्यंत बेल्लारीतील सर्व खाणकाम ताबडतोब बंद करण्यात यावे, असा आदेश काल मुख्य न्यायमूर्ती एस. एच. कापाडिया, न्या. स्वतंत्र कुमार आणि न्या. आफताब आलम यांच्या खंडपीठाने दिला.
येथील पर्यावरणाच्या र्हासाची जबाबदारी कर्नाटक सरकारने घ्यावी आणि परिसराच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत, असेही खंडपीठाने सुनावले. पोलाद उद्योगासाठी नेमके किती खनिज आवश्यक आहे ते सांगणारा अंतरिम अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तयार करावा, असेही खंडपीठाने सांगितले.