जनहित मंडळ आणि भारत विकास परिषदेने आयोजित केलेल्या शारदा व्याख्यानमालेतील अंतिम पुष्पात ‘भारतीय शिक्षण पद्धती आणि मेकॉले’ या विषयावर ते बोलत होते. त्याकाळी मेकॉलेने सादर केलेले भारतामध्ये शिक्षण देण्याचे विधेयक ब्रिटीश संसदेत मंजूर करण्यात आले. आज आपण पहातो ७० टक्के समाज मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीबाहेर आहे. खरेतर मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीची फळे मोजक्याच वर्गाला लाभधारक ठरली, असेही त्यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, काल व्याख्यानाच्या प्रारंभी काणकोण येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दु:ख व्यक्त करण्यात आले. मनाली पार्सेकर हिने ’वन्दे मातरम’ गीत सादर केले. निमंत्रित प्रमुख अतिथी मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिमा वेर्णेकर यांनी परिचय आणि स्वागत केले. संयोजक बिपीन नाटेकर यांनी आभार मानले. शेवटी उर्विजा नागवेकर यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.