‘+92′ क्रमांकाबाबत सावध राहा; घाबरू नका : मुख्यमंत्री

0
18

>> पालकांना येताहेत मुलांच्या अपहरणाचे कॉल

राज्यातील काही पालकांना क्रमांक ‘+92′ पासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरून मुलांच्या अपहरणाबाबत कॉल येऊ लागले आहेत. यासंबंधी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाकडे तक्रार करण्यात आली असून, तपासकामाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील शालेय मुले सुरक्षित आहेत. पालकांना येणारे कॉल बनावट असून, पालकांनी घाबरण्याची गरज नाही, असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
शालेय मुलांच्या अपहरणाचा एकही प्रकार घडलेला नाही. राज्यातील पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. अपहरणाचे कॉल्स हा एक फसवणूक करण्याचा प्रकार असून, पालकांनी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. परदेशातून अशा प्रकारचे कॉल्स केले जात आहेत. तसेच +92 पासून येणारे फोन कोणीही उचलू नयेत. सायबर गुन्हा विभाग या प्रकरणी तपास करीत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.