पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील 70 हजार तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे दिली. सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. विविध सरकारी विभागात या तरुणांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशात सुरू असलेली ही रोजगार मोहीम पारदर्शकता आणि सुशासनाचा पुरावा आहे. आपल्या देशातील राजकीय पक्षांनी कोट्यवधी जनतेचा विश्वासघात केला. आमच्या सरकारने पारदर्शकता आणली आणि घराणेशाही संपवली, असे मोदी म्हणाले.