7 शिक्षकांना मुख्यमंत्री-वशिष्ठ गुरू पुरस्कार

0
1

>> आज शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण

शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कार्यासाठी 7 गुणवंत शिक्षकांना मुख्यमंत्री-वशिष्ठ गुरू पुरस्कार (2023-2024) जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवार दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 63 व्या शिक्षकदिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात हा कार्यक्रम होईल.

प्राथमिक शिक्षक श्रेणीतील महेश चंद्रकांत कशाळकर (सरकारी प्राथमिक शिक्षक, मोपा-पेडणे), प्रतिमा प्रकाश प्रभूगावकर (सरकारी प्राथमिक शिक्षिका, पैंगीण, काणकोण) यांना जाहीर झाला आहे.

माध्यमिक शिक्षक श्रेणीत सुधीर तुकाराम नाईक (चित्रकला शिक्षक, सातेरी विद्या मंदिर, इब्रामपूर-पेडणे), ज्योती व्यंकटेश सिनारी (सहाय्यक शिक्षिका, रमाकांत नाईक मेमोरियल सरकारी हायस्कूल, सुर्ला-डिचोली) यांना दिला जाणार आहे.

हायस्कूल मुख्याध्यापक श्रेणीत शिरीषकुमार विनायक आमशेकर (मुख्याध्यापक, एसएसएम स्वस्तिक विद्यालय, प्रियोळ-म्हार्दोळ), उच्च माध्यमिक शिक्षक श्रेणीत शिरीष श्रीरंग भिडे (धेंपो उच्च माध्यमिक कला, विज्ञान आणि वाणिज्य विद्यालय, कुजिरा-बांबोळी) आणि उच्च माध्यमिक प्राचार्य श्रेणीत विठ्ठल अंकुश पार्सेकर (डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालय, कोलवाळ-बार्देश) यांना मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार जाहीर झाला आहे.