6 लाखांच्या दागिन्यांची चोरी; महिलेस अटक

0
18

आगशी पोलिसांनी अंदाजे 6 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी प्रकरणी एका महिलेला काल अटक केली. प्रणाली नाईक (रा. डोंगरी-मंडूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. संशयित प्रणाली हिच्यावर मैत्रिणीचे अंदाजे 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीचा आरोप आहे. चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.