6 धरण प्रकल्पांसाठी सल्लागारांकडून अर्ज मागवले

0
17

राज्य सरकारच्या जलस्रोत खात्याने म्हादई खोऱ्यात 6 धरण प्रकल्पांसाठी सल्लागार सेवा पुरविण्यासाठी पात्र कंत्राटदारांकडून अर्ज मागविले आहेत. जलस्रोत खात्याकडून निरंकाल, रिवेम, नानोडा, सोनाळ, मातोजनवाडा आणि बोळकर्णे (रगडा-3) येथे सहा धरण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या धरण प्रकल्पासाठी सल्लागारांची निवड केली जाणार आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स ज्यांनी तत्सम कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत, ते अर्ज करण्यास पात्र आहेत, असे जलस्रोत खात्याने स्पष्ट केले आहे.