53 लाखांचे ड्रग्स कांदोळी येथे जप्त

0
17

केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) कांदोळी येथे केलेल्या एका कारवाईत आंतरराज्य अमलीपदार्थांच्या व्यवहाराचा पर्दाफाश केला असून, सुमारे 53.20 लाख रुपयांचे अमलीपदार्थ काल हस्तगत केले. गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी हरमल येथे सुमारे दीड कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने उत्तर गोव्यातील कांदोळी येथे दोन राजस्थानी युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 532 ग्रॅम मथोम्फेटामाईड अमलीपदार्थ जप्त केला.