53 व्या वर्धापनदिनी ‘नवप्रभा’वर शुभेच्छांचा वर्षाव

0
53

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री गोविंद गावडे, रोहन खंवटे, खासदार सदानंद तानावडे आदींची उपस्थिती

दैनिक नवप्रभाने काल 53 वर्षे पूर्ण करून 54 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती व क्रीडामंत्री श्री. गोविंद गावडे, पर्यटन व माहिती तंत्रज्ञानमंत्री श्री. रोहन खंवटे, राज्यसभेचे खासदार श्री. सदानंद तानावडे, माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नवहिंद भवन येथे कर्मचारीवर्गातर्फे आयोजित श्रीसत्यनारायण महापूजेस उपस्थित राहून ‘नवप्रभा’ला शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांमध्ये डॉ. शेखर साळकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष श्री. दशरथ परब व सौ. परब, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश वंसकर व कवी प्रकाश तळवडेकर, सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. विजय कापडी, माजी शिक्षणाधिकारी श्री. ज. अ. रेडकर, ॲड. सुभाष पुंडलिक सावंत, उद्योजक श्री. मांगीरिश पै रायकर, श्री. मंगलदास नाईक, भारतमाता की जय संघटनेचे श्री. सुभाष वेलिंगकर, माजी मजूर आयुक्त श्री. शरत्चंद्र देशप्रभू, दैनिक गोमन्तकचे सरव्यवस्थापक श्री. सचिन पोवार, वितरण व्यवस्थापक श्री. भारत पवार, गोवा मोटारसायकल टॅक्सी रायडर संघटनेचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर व श्री. लाडू हरी नाईक, श्री. विजय कळंगुटकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे, गुरुदास सावळ, सतीश नाईक, सुरेश काणकोणकर, श्री. सागर अग्नी, श्री. प्रदीप नाईक, सौ. रूपा प्रदीप नाईक, शर्वाणी प्र. नाईक, कनक प्र. नाईक, प्रा. शशिकांत सरदेसाई, श्री. शशिकांत अर्जुनराव सरदेसाई, तुकाराम शेटगावकर, श्री. प्रवीण व सौ. नीला भोजराज, लेखक अरुण जयराम कामत, पांडुरंग फळदेसाई, ज्योती कुंकळकर व संपदा कुंकळकर आदींचा समावेश होता. धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास धेंपो व नवहिंद प्रकाशन समूहाच्या कार्यकारी संचालक सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो, दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू , दैनिक नवहिंद टाइम्सचे प्रभारी संपादक श्री. रामनाथ पै रायकर, नवहिंद वृत्तपत्र समूहाचे महासरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर, यतीश धेंपो आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘नवप्रभा’ ला दूरध्वनीद्वारेही शुभेच्छा दिल्या.