51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड

0
5

11 नोव्हेंबर रोजी घेणार शपथनवी दिल्ली

भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा केली. मावळते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून 11 नोव्हेंबर रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. याच दिवशी विद्यमान सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा कालावधी संपत आहे. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निकाल घेतले आहेत.

न्यायमूर्ती खन्ना यांनी प्राप्तिकर विभागासाठी वरिष्ठ वकील म्हणून काम केले आणि 2004 मध्ये दिल्लीच्या एनसीटी (सिव्हिल) विभागासाठीही वकिली केली. दिल्ली उच्च न्यायालयात काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्यांनी अतिरिक्त सरकारी वकील म्हणूनही भूमिका बजावली.