50 नव्या इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा निर्णय

0
13

कदंब महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत महामंडळासाठी 50 नव्या 9 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक एसी बसेस विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बसेससाठी कदंबच्या डेपोमध्ये चार्जिंगसाठीची साधनसुविधाही उभारण्यात येणार आहे. या बसेससाठी मोबाईल ॲपवरून तिकिट बुक करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.