वन खात्याचा राज्यातील 5 वन्यजीव अभयारण्यांमध्ये अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव आहे. वन विभागाकडून पृष्ठभाग निरीक्षण नेटवर्क वाढवण्याचा एक भाग म्हणून राज्यातील 5 वन्यजीव अभयारण्यांमध्ये जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस (जीपीआरएस) आधारित स्वयंचलित हवामान केंद्रांचे अत्याधुनिक नेटवर्क उभारण्यात येणार आहे. अंदाजे 65 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा विकसित केली जाणार आहे. या निविदेसंबंधी पूर्व बोली बैठक 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता जुन्ता हाउसमधील उपवनपालांच्या (वन्यजीव व इको टूरिझम) कार्यालयात घेण्यात येणार आहे. भरलेली निविदा ऑनलाइन पद्धतीने 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 3 वाजेपर्यंत सादर केली जाऊ शकते. 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता निविदा उघडण्यात येणार आहे. जीपीआरएस आधारित एडब्लूएस 5 ठिकाणी स्थापित केले जातील आणि सेंट्रल डेटा रिसिव्हिंग आणि प्रोसेसिंग स्टेशन वनभवन, आल्तिनो, पणजी येथे स्थापित केले जाणार आहे. नेटवर्कमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये बोंडला, मोले, म्हादई, खोतीगाव, नेत्रावळी येथील अभयारण्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.