4 दिवसांत पोलिसांकडून 4885 वाहनचालकांना दंड

0
11

राज्यातील वाहतूक पोलीस विभागाने रात्रीच्या वेळी वाहतूक नियम अंमलबजावणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलीस विभागाने 22 ते 25 मे या चार दिवसाच्या संध्याकाळी 6 ते रात्री 10.30 या वेळेत वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी 4885 वाहनचालकांना दंड ठोठावला आहे. त्यात मद्यपान केलेल्या 70 वाहनचालकांचा समावेश होता, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी काल दिली. धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याप्रकरणी 6 जणांना दंड ठोठावला. हेल्मेट परिधान न केलेल्या 100 दुचाकी चालकांना दंड ठोठावला. वाहन लाइटप्रकरणी 280 जणांना दंड, काळ्या काचाप्रकरणी 22 जणांना दंड, धोकादायक वाहन पार्किंग 127 जणांना दंड, नो एन्ट्रीमध्ये प्रवेश प्रकरणी 47 जणांना दंड, अयोग्य वाहन क्रमांकपट्टी प्रकरणी 61 जणांना दंड आणि इतर प्रकरणांमध्ये 177 वाहनचालकांचा दंड ठोठावला, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.