38 वर्षीय तरुणाचा खून; तिघा संशयितांना अटक

0
5

मोरजी येथील नितेश सदानंद परब (38) ह्या तरुणाचा खून केल्या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी संशयित म्हणून संजय कोले, लक्ष्मी सावंत, प्रजय कोले व इतरांविरुद्ध काल गुन्हा नोंद केला. तसेच मांद्रे पोलिसांनी तीन मुख्य संशयितांना अटक केली.

नितेश सदानंद परब याला मंगळवारी जमावाने जबर मारहाण केली होती. त्यात संजय कोले, लक्ष्मी सावंत, प्रजय कोले व इतरांचा समावेश होता. बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्यावर बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू होते. चार दिवसांनी काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला.