सर्वोच्च न्यायालयाने 14 वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भधारणेच्या 30 आठवड्यांत गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयाला गर्भपाताची तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी 19 एप्रिलला तातडीची सुनावणी घेतली होती, त्यात न्यायालयाने मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. काल सकाळी 10.30 वाजता रुग्णालयाने सर्वोच्च न्यायालयात अहवाल दाखल केला.