250 टुरिस्ट टॅक्सीमालकांना जीएसटी नोंदणीसाठी नोटिसा

0
1

व्यावसायिक कर विभागाने राज्यातील जवळपास 250 टुरिस्ट टॅक्सीमालकांना जीएसटी नोंदणी न केल्यामुळे नोटिसा बजावल्या आहेत. कर विभागाने चारपेक्षा जास्त टॅक्सी असलेल्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. टॅक्सी मालकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे.

टॅक्सीमालकाचे वार्षिक उत्पन्न 20 लाखांच्या पुढे गेल्यावर त्याने जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. 5 टॅक्सी म्हणजे एका वर्षाला 20 लाखांचे उत्पन्न पार होते, असा अंदाज व्यक्त केला जातो. व्यावसायिक कर विभागाच्या पाहणीत एका व्यक्तीकडे 14 टॅक्सी असल्याचे समोर आले आहे.

व्यावसायिक कर विभाग वाहतूक खात्याकडून टुरिस्ट, काळ्या-पिवळ्या आणि भाड्याच्या टॅक्सींसह एकूण टॅक्सी किती आहेत याचा अहवाल घेत आहे. तर, आयकर विभागाकडून त्यांनी आयकर भरला की नाही आणि किती आयकर भरला याचा आढावा घेतला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.