24 तासांच्या आत गाझा सोडा; इस्रायलचा पॅलेस्टिनींना इशारा

0
4

इस्रायलने काल गाझामधील लोकांना उत्तर गाझा रिकामे करण्यास सांगितले. उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींनी 24 तासांच्या आत दक्षिणेकडे निघून जावे, तेथे राहणारे लोक त्यांचे शत्रू नाहीत. त्यांना फक्त हमासचा नाश करायचा आहे, अशी सूचना इस्रायलने केली. दुसरीकडे, हमासने लोकांना त्यांची जागा सोडून कुठेही जाऊ नका, जिथे आहात तिथेच राहण्यास सांगितले आहे. इस्रायलच्या इशाऱ्यानंतर तेथील पॅलेस्टिनी नागरिकांनी आपली घरे सोडत दुसरीकडे स्थलांतर सुरू केले आहे. त्याचवेळी इस्रायलच्या आदेशावर, यूएनने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, गाझामधील जवळपास 1800 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.