2027 मध्ये ‘एसटीं’ना राजकीय आरक्षण मिळेल

0
14

>> सभापती रमेश तवडकरांकडून विश्वास व्यक्त

राज्यातील अनुसूचित जमातींना (एसटी) 2027 सालापर्यंत राजकीय आरक्षण मिळेल, असा विश्वास काल सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. गोव्यातील अनुसूचित जमातींना गोवा विधानसभेत राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रातील भाजप सरकारने त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगून 2027 साली राज्यात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना हे राजकीय आरक्षण मिळेल, असे तवडकर म्हणाले.
भाजप सरकारनेच राज्यातील गावडा, कुणबी व वेळीप यांना अनुसूचित जमातींचा दर्जा मिळवून दिला, याची आठवण तवडकर यांनी करून दिली.
मनोहर पर्रीकर सरकारच्या मंत्रिमंडळात आपणाला जेव्हा आदिवासी कल्याण खाते मिळाले होते, तेव्हा आपण राज्यातील आदिवासींच्या कल्याणासाठी 25 योजना सुरू केल्या होत्या, असे तवडकर म्हणाले. या योजनांमुळे आदिवासींचा मोठा फायदा झाल्याचे ते म्हणाले.