कळंगुट समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदा उभारण्यात आलेल्या सुमारे 200 झोपड्या येत्या दोन महिन्यात हटविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राज्य सरकारकडून काल देण्यात आली. गोवा खंडपीठात एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी कळंगुट समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदा झोपड्या उभारून त्यात पारंपरिक मच्छिमारी होड्या ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पारंपरिक मच्छीमार सुध्दा पर्यटन खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून मच्छिमारी होड्या ठेवू शकत नाही, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.