2 पोलीस निरीक्षकांच्या
बदल्यांचा आदेश जारी

0
3

पोलीस खात्याने राज्यभरातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काल जारी केला. कळंगुटचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांची सुरक्षा विभाग पणजी येथे बदली करण्यात आली असून, म्हापशाचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांची कळंगुटच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण देसाई यांची केपे, दीपक एम. पेडणेकर यांची बेतुल किनारी सुरक्षा, विजयकुमार चोडणकर यांची सुरक्षा विभाग पणजी, तुषार लोटलीकर यांची फोंडा, मार्लन डिसोझा यांची म्हापसा वाहतूक, मेल्सन कुलासो यांची वेर्णा, डायगो ग्रासियस यांची पोलीस मुख्यालय पणजी, सचिन लोकरे यांची पेडणे, सूरज गावस यांची पोलीस मुख्यालय पणजी आणि रिमा नाईक यांची महिला पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे.