2 अधिकाऱ्यांसह 2 जवान शहीद

0
36

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकी दरम्यान भारतीय लष्कराच्या दोन कॅप्टनसह 2 जवानांनी प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी 9 वाजता लष्कराला राजौरी जिल्ह्यात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी दोन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी जवानांना दिली. यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. त्या दहशतवाद्यांजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी लष्करावर वेगाने गोळीबार सुरू केला. या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि दोन जवानांना प्राण गमवावे लागले.